पूणेमहाराष्ट्र

चेटीचंड महोत्सवातून सिंधी संस्कृती, सामाजिक एकतेचे दर्शन

सिंधू सेवा दलातर्फे भगवान साई झुलेलाल यांचा १०७६ वा जन्मोत्सव व सिंधी नववर्षाचा आनंदोत्सव साजरा

चेटीचंड महोत्सवातून सिंधी संस्कृती, सामाजिक एकतेचे दर्शन

सिंधू सेवा दलातर्फे भगवान साई झुलेलाल यांचा १०७६ वा जन्मोत्सव व सिंधी नववर्षाचा आनंदोत्सव साजरा

रिपोर्ट :विशाल समाचार

स्थान:पुणे महाराष्ट्र

पुणे : ‘आयो लाल झुलेलाल’च्या जयघोषात भगवान साई झुलेलाल यांची भक्तीभावाने केलेली आरती… झुलेलाल यांच्या मनमोहक प्रतिमेचे पूजन… सिंधी गीतांची बहारदार मैफल… कलात्मक नृत्याविष्कार… चाट-सामोसा-गोड भाताचा प्रसाद… रुचकर लंगर… डोक्यावर लाल टोपी आणि साई झुलेलाल यांचे ‘लाल झुले लाल झुले लाल झुलेलाल’ हे अखंड भजन अशा भावभक्तीमय वातावरणात सिंधी संस्कृतीचे दर्शन घडले. पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील ५००० पेक्षा अधिक आबालवृद्धांनी या महोत्सवात सहभागी होत सिंधी समाजाच्या एकतेचे दर्शन घडवले.

सिंधी समाजाचे नवीन वर्ष व भगवान साई झुलेलाल यांच्या १०७६ व्या जन्मोत्सवानिमित्त सिंधू सेवा दलातर्फे ‘चेटीचंड’ महोत्सव आयोजिला होता. येरवड्यातील डेक्कन कॉलेजच्या बँक्वेट हॉल व मैदानावर झालेल्या या महोत्सवात सहभागी प्रत्येक सिंधी बंधू-भगिनींच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. भगवान साई झुलेलाल यांच्या प्रतिमेचे पूजन करून सामाजिक आणि सांस्कृतिक महोत्सवाची सुरुवात झाली. संगीत, गायन, भजन आणि महाप्रसादातील विविध पदार्थ आणि खास महिलांचाच सहभाग असलेल्या म्युझिक बँडचे सादरीकरण यामुळे यंदाचा चेटीचंड महोत्सव वैशिष्ट्यपूर्ण ठरला. गायिका, वादक, कीबोर्ड प्लेयर, ड्रमर अशा प्रत्येक भूमिकेत महिला कलाकारांनी आपल्या प्रतिभेचा ठसा उमटवत ‘नारी शक्ती’चा प्रभावी आविष्कार घडवला.

 

विविध शहरातील १६ सिंधी महिला कलाकारांनी एकत्र येऊन हा म्युझिक बँड सुरु केलेला असून, महिला सक्षमीकरणाच्या उद्देशाने त्यांना सांस्कृतिक सादरीकरणाची संधी देण्यात आली. सिंधी ऑर्केस्ट्राचा लाईव्ह कॉन्सर्ट उपस्थितांनी अनुभवला. जनरेशन नेक्स्ट डान्स अकादमीतर्फे आकर्षक नृत्यकलेचे सादरीकरण झाले. प्रीतिभोजने (महाप्रसाद) महोत्सवाची सांगता झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध सिंधी स्टँड-अप कॉमेडियन आणि अभिनेता मोहित शेवानी यांनी केले. त्यांच्या प्रभावी शैलीने कार्यक्रमात रंगत आणली.

न्यूज १८ चे व्यवस्थापकीय संचालक किशोर आजवानी यांच्या हस्ते साई झुलेलाल यांची महाआरती झाली. उद्योजक मनोज मोटवानी यांचा विशेष गौरव करण्यात आला. यावेळी सिंधू सेवा दलाचे अध्यक्ष सचिन तलरेजा, माजी अध्यक्ष सुरेश जेठवानी, अशोक वासवानी, दीपक वाधवानी, विजय दासवानी, सचिव राजेंद्र फेरवानी, खजिनदार जय पिंजानी, जनसंपर्क अधिकारी देवेंद्र चावला आदी उपस्थित होते.

 

सचिन तलरेजा म्हणाले, “सिंधी संस्कृती विषयी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासह सिंधी परंपरा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी सिंधू सेवा दल गेली ३९ वर्ष कार्यरत आहे. चेटीचंड महोत्सवानिमित्त सर्व समाज एकत्र येतो. भगवान साई झुलेलाल यांचा उत्सव साजरा करतो. हा आनंदाचा क्षण अनुभवण्यासाठी आम्हीही दरवर्षी यामध्ये सहभागी होतो.”

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button