दुसरी जी एच रायसोनी मेमोरियल पुणे आंतरराष्ट्रीय फिडे रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धा १४ जुलैपासून
पुणे: जीएच रायसोनी स्पोर्ट्स अँड कल्चरल फाऊंडेशन आणि कल्पना प्रकाश वेलफेअर फाऊंडेशन यांच्या वतीने 14 जुलै 2024 रोजी जी एच रायसोनी काॅलेज आॅफ इंजीनिअरिंग आणि मॅनेजमेंट, वाघोली, पुणे येथे दुसरी जीएच रायसोनी मेमोरियल पुणे आंतरराष्ट्रीय फिडे रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
पुणे जिल्हा बुद्धिबळ मंडळ (PDCC), महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना (MCA), ऑल इंडिया चेस फेडरेशन (AICF) आणि जागतिक बुद्धिबळ महासंघ (FIDE) यांनी या स्पर्धेला मान्यता दिली आहे. या स्पर्धा संपूर्ण भारतातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जा मिळविण्याची आणि रॅपिड बुद्धिबळ फॉरमॅटमध्ये त्यांचे रेटिंग वाढवण्याची महत्त्वपूर्ण आहेत. इंटरनॅशनल मास्टर (IM) अक्षत कंपारिया, अभिषेक केळकर, फिडे मास्टर निखिल दीक्षित, वेदांत पानेसर, अक्षय बोरगावकर आणि 240 हून अधिक खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे.
विजेत्यासाठी एकूण 3 लाख रुपयांची बक्षिसे असणार आहेत.रोख पारितोषिकांव्यतिरिक्त, आयोजकांनी 7, 9, 11, 13 आणि 15 वर्षांखालील मुलांसाठी आणि मुलींसाठी स्वतंत्रपणे पहिल्या 10 खेळाडूंना आकर्षक ट्रॉफी देण्यात येणार आहे. तसेच विविध फिडे रेटिंग गटांव्यतिरिक्त सर्वोत्कृष्ट खेळाडू यांना ही पारितोषिक देण्यात येणार आहे. रायसोनी एज्युकेशन अध्यक्ष श्री सुनील रायसोनी, रायसोनी एज्युकेशनचे कार्यकारी संचालक, श्री श्रेयश रायसोनी खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी मदत करत आहेत.
नोंदणीची अंतिम तारीख 10 जुलै आहे. या स्पर्धेत एकूण 9 फेऱ्यांचा समावेश असून 14 जुलै रोजी सकाळी 9:00 वाजता उद्घाटन समारंभ आणि त्याच दिवशी सायंकाळी 7:30 वाजता बक्षीस वितरण समारंभ होणार आहे.
आयोजन समितीमध्ये कल्पना प्रकाश वेलफेअर फाऊंडेशन चे सचिव श्री भूषण श्रीवास, एमसीए निरीक्षक समिती सदस्य, श्री एस. एस. सोमण, जी एच रायसोनी काॅलेज आॅफ इंजीनिअरिंग आणि मॅनेजमेंट, पुणेचे कॅम्पस संचालक डॉ. आर. डी. खराडकर, क्रिडा शिक्षक विकास दिघे, आय.ए. अजिंक्य पिंगळे, आय.ए. विनिता शोत्री, श्री अमित केंच, श्री अमित टेंभुर्णे, श्री प्रयास यांचा समावेश आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एमसीएचे उपाध्यक्ष श्री गिरीश व्यास, रायसोनी ग्रुपचे प्रकल्प प्रमुख डॉ. मृणाल नाईक आणि श्री अमित गंधारे, अंबाडे आणि श्री सागर साखरे परिश्रम घेत आहेत.