एमआयटी एडीटी विद्यापीठात स्वातंत्र्य दिनानिमत्त ध्वजारोहण
पुणे : देशभरात सर्वत्र भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत आहे. याच दिनाचे औचित्य साधत एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठातील विद्यार्थी यांनी मानवी साखळी द्वारा भारतीय नकाशा तयार करत भारतीय तिरंग्याला मानवंदना दिली. भारतीय स्वातंत्र्याचा 76 व्या स्वातंत्र्य दिनानिमत्त निवृत्त मेजर जनरल विजय चौघुले, विद्यापीठाचे कार्याध्यक्ष आणि कुलगुरू प्रा. डॉ. मंगेश कराड यांच्या हस्ते विद्यापीठात ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्र कुलगुरू अनंत चक्रदेव, कुलसचिव डॉ. महेश चोपडे, डॉ. सुनिता मंगेश कराड, महाराष्ट्र अकॉडमी ऑफ नेव्हल एज्युकेशन आणि ट्रेनींगचे (मॅनेट) प्राचार्य प्रा. सुबोध देवगावकर, स्कूल ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. किशोर रवांदे, डॉ. रामचंद्र पुजेरी, डॉ. सुदर्शन सानप, क्रीडा संचालक प्रा. पद्माकर फड, डॉ. रजनीश कौर सचदेव आदी उपस्थित होते. निवृत्त मेजर जनरल विनय चौघुले यांनी ध्वजारोहण समारंभाला उपस्थित शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची भेट घेऊन स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. दरम्यान एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तीपर गीत व नृत्य सादर केले.